Ad will apear here
Next
दागिन्यांच्या घडणावळीवर शंभर टक्के सवलत
‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स’तर्फे ‘अँड १०० %’ योजना

पुणे : दागिन्यांच्या घडणावळीवर शंभर टक्के मजुरी माफ असल्यास दागिने खरेदीचा आनंद नक्कीच द्विगुणीत होतो. त्यामुळेच पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.ने सोने-चांदी व हिऱ्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर शंभर टक्के सवलतीची ‘अँड १००%’ योजना सुरू केली आहे. कंपनीच्या सर्व दालनांमध्ये ही योजना उपलब्ध आहे. 

या योजनेबाबत कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) अदित्य मोडक म्हणाले, ‘उदा. एखाद्याने योजनेत दहा समान मासिक हप्त्यांत दरमहा तीन हजार रुपये गुंतविल्यास मुदतपूर्तीस तीस हजार रुपये जमा असतील. मुदतपूर्तीनंतर तेवढ्याच रकमेचा दागिना घेतल्यावर दागिन्याच्या मजुरीवर शंभर टक्के सूट मिळेल व ग्राहकास केवळ लागू असणारा कर जमा रकमेव्यतिरिक्त भरावा लागेल. जमा रकमेपेक्षा जास्तीच्या रकमेच्या दागिन्याच्या खरेदीवर मजुरीमध्ये पाच टक्के सूट दिली जाईल. दागिने खरेदीसाठी भिशी वा रिकरिंग लावण्याऐवजी ही योजना अधिक आकर्षक आहे. या योजनेत एकदम रक्कम भरण्याचा पर्याय आहे.’  

‘आतापर्यंत अशी योजना या पूर्वी सुरू झालेली नाही आणि योजनेचे वैशिष्ट्य जमा रकमेपर्यंतच्या किमतीच्या दागिन्याची घडणावळ माफ, हेच आहे. योजनेमुळे पुढील सणासुदीला दागिने खरेदीचा आनंद नक्कीच वाढणार आहे’,असे कंपनीचे अध्यक्ष व संचालक अजित गाडगीळ यांनी नमूद केले. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZNOBV
Similar Posts
पु. ना. गाडगीळ आणि सन्सतर्फे विशेष सवलत योजना पुणे : लग्नसराई लक्षात घेऊन पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.ने विशेष सवलत योजना जाहीर केली असून, ग्राहकांचा तिला उदंड प्रतिसाद मिळत आहे. आता योजनेचे शेवटचे काही दिवस राहिले असून, येत्या २ जूनपर्यंतच ही योजना सुरू राहणार आहे.
‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स’तर्फे अक्षय्य तृतीयेसाठी विशेष कलेक्शन पुणे : सोन्याला आपल्याकडे समृद्धी समजले जाते आणि साडेतीन मुहूर्तांपैकी अक्षय्य तृतीया ही सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी सर्वोत्तम समजण्यात येते. त्यामुळेच अक्षय्य तृतीया व आगामी लग्नसराई लक्षात घेऊन पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेडने दाक्षिणात्य शैलीवर आधारित दागिन्यांचे विशेष कलेक्शन बाजारात आणले आहे
‘पीएनजी’तर्फे अक्षय्य तृतीयेसाठी विशेष कलेक्शन पुणे : सोन्याला आपल्याकडे समृद्धी म्हणून समजले जाते आणि साडेतीन मुहूर्तांपैकी अक्षय्य तृतीया ही सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी सर्वोत्तम समजण्यात येते. त्यामुळेच अक्षय्य तृतीया व आगामी लग्नसराई लक्षात घेऊन पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेडने दाक्षिणात्य शैलीवर आधारित दागिन्यांचे विशेष कलेक्शन बाजारात आणले आहे
‘पी. एन. जी अँड सन्स’तर्फे झरोका ज्वेलरी सादर पुणे : आधुनिक स्थापत्यशैलीत लोप पावलेल्या व भारतीय ठेवा असणाऱ्या ‘झरोक्या’ला पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.ने दागिन्यांच्या नव्या कलेक्शनचा अविभाज्य अंग बनविला असून, आकर्षक झरोका कलेक्शन सादर केले आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language